Natepute Express
MARATHI NEWS

ताज्या मराठी बातम्या

जालन्याची रेशीम कोष बाजारपेठ असेल टॅक्स फ्री
महाराष्ट्र

जालन्याची रेशीम कोष बाजारपेठ असेल टॅक्स फ्री

LATEST STORIES

नवीन बातम्या

139 निकाल
जालन्याची रेशीम कोष बाजारपेठ असेल टॅक्स फ्री
महाराष्ट्र

जालन्याची रेशीम कोष बाजारपेठ असेल टॅक्स फ्री

रेशीम कोष विक्रीसाठी शेतकऱ्यांना ‎आता कर्नाटकच्या रामनगर‎ बाजारपेठेपर्यंत जावे लागणार‎ नाही. त्यासाठी जालन्यातच रेशीम ‎कोष बाजारपेठ विकसित करण्यात ‎आली आहे. कर्नाटकच्या ‎बाजारपेठेत 1 टक्के शुल्क‎ आकारले जाते. ते येथे माफ ‎राहणार आहे. शिवाय कोषाचे ‎वैज्ञानिक ग्रेडिंग उपलब्ध असेल.‎ड्रायिंगची अत्याधुनिक सुविधा‎ असेल. लिलाव आणि व्यवहार ‎डिजिटल होतील. येथे शेतकरी ‎आणि व्यापाऱ्यांसाठी निवासाची ‎सुविधाही उपलब्ध करून देण्यात‎ आली आहे. 14 ऑगस्ट रोजी ‎मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या‎ हस्ते या बाजारपेठेचे उद्घाटन केले ‎जाणार आहे.‎ जालना बाजार समितीत गेल्या 8‎ वर्षांपासून सुरू असलेली ही रेशीम‎ कोष बाजारपेठ आता स्वतःच्या ‎जागेत स्थलांतरित होत आहे. 14‎ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‎या बाजारपेठेचे उद्घाटन होईल.‎

Natepute Pratinidhi
मराठ्यांना फक्त प्रचारासाठी वापरायचे का?:मनोज जरांगेंचा इशारा
सोलापूर जिल्हा

मराठ्यांना फक्त प्रचारासाठी वापरायचे का?:मनोज जरांगेंचा इशारा

मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका कायम ठेवणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सांगलीनंतर आता ते सातारा जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. आज मायणी, मसूर आणि पाचवड येथे त्यांच्या बैठका आणि सभा होणार असून, उद्या पाटणमध्ये जाहीर सभा आणि साताऱ्यात पत्रकार परिषद होणार आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारही सक्रिय झाले आहे. मराठा आरक्षण उपसमितीची आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक होणार आहे. या दौऱ्यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत सरकारने झालेली चूक मान्य करून ती दुरुस्त करावी, अशी मागणी केली आहे. मराठा आरक्षणाशी संबंधित निर्णय, प्रमाणपत्रे आणि प्रलंबित मागण्यांवरून त्यांनी सरकार तसेच अधिकाऱ्यांना सुनावले.

Natepute Pratinidhi
सरकारने लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा
महाराष्ट्र

सरकारने लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा

मराठा आरक्षणासाठी चिठ्ठी लिहून एका 30 वर्षीय युवकाने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिंतूर तालुक्यातील बामणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भोसी येथे 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी ही घटना घडली. गणेश आश्रोबा ठोंबरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश ठोंबरे याने राहत्या घरात दोरीने गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर नातेवाइकांनी त्याला तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी मुंडे यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. दरम्यान, बामणी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात जाऊन प्राथमिक पंचनामा केला. मृताच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश ठोंबरे हा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून अत्यंत निराश होता.

Natepute Pratinidhi
3 विद्यार्थिनींच्या मृत्यूवरून राजकारण तापलं
महाराष्ट्र

3 विद्यार्थिनींच्या मृत्यूवरून राजकारण तापलं

गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा झालेला मृत्यू अतिशय दुर्दैवी असून राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, या दुर्दैवी घटनेवर संजय राऊत केवळ राजकारण करत आहेत आणि राजकीय पोळी भाजत आहेत. राऊतांनी सरकारला प्रश्न विचारण्यापूर्वी ही आश्रमशाळा नक्की कुणाची आहे, याची माहिती घ्यायला हवी होती. ती आश्रमशाळा काँग्रेसचे माजी खासदार मारोतराव कोवासे यांचीच आहे, असा खळबळजनक खुलासा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन यांनी संजय राऊत आणि महाविकास आघाडीवर (MVA) सडकून टीका केली. आश्रमशाळा काँग्रेस नेत्याची, मग राऊत काँग्रेसला जाब विचारणार का? सर्पदंशाच्या घटनेचा संदर्भ देत बन म्हणाले, "ज्या आश्रमशाळेत हा प्रकार घडला, ती संस्था काँग्रेसचे अनेक वर्षे खासदार राहिलेले आणि स्थानिक नेते मारोतराव कोवासे यांची आहे. राज्य सरकार प्रत्येक विद्यार्थ्यामागे दोन हजार रुपये अनुदान देते, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची प्राथमिक जबाबदारी ही संस्थाचालकाची असते.

Natepute Pratinidhi
महाराष्ट्रात आजपासून दूध महागलं
महाराष्ट्र

महाराष्ट्रात आजपासून दूध महागलं

महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर आणखी एक भार पडला आहे. महाराष्ट्रात आज, 11 ऑगस्ट 2026 पासून गायीच्या आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गायीचे दूध 60 रुपयांवरून 62 रुपये, तर म्हशीचे दूध 76 रुपयांवरून 78 रुपये प्रतिलिटर झाले आहे. दूध उत्पादक आणि दूध प्रक्रिया उद्योगाच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दुधाच्या दरवाढीचा परिणाम केवळ पिशवीतील दूध खरेदीवर होणार नसून दही, ताक, लोणी, पनीर, चीज, तूप, फ्लेवर्ड मिल्क आणि दुधापासून तयार होणाऱ्या मिठाईच्या किमतींवरही होण्याची शक्यता आहे. या दुग्धजन्य पदार्थांच्या दरात सुमारे 10 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Natepute Pratinidhi
रांचीमध्ये विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज
महाराष्ट्र

रांचीमध्ये विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज

रांचीमध्ये विद्यार्थ्यांवर अमानुष हल्ला करणारे हे 'इंडिया' आघाडीतीलच हल्लेखोर आहेत. यामुळे काँग्रेसला तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. काँग्रेस आणि राहुल गांधी यांची भूमिका या प्रकरणात पूर्णपणे दुटप्पी आहे, असे म्हणत रांची येथे नोकरभरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्यावरून भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेस, राहुल गांधी तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आशिष शेलार म्हणाले की, रांचीतील या गंभीर घटनेवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची बोबडी का बंद आहे? तेथील तरुण-तरुणी आणि विद्यार्थी हे आपले नाहीत का? या प्रकरणात मातोश्री आणि शिवतीर्थाचे दरवाजे बंद का आहेत? विरोधी पक्षांनी केवळ राजकीय सोयीची भूमिका घेण्याचे काम केले असून, ते कधीही विद्यार्थ्यांचे हित पाहत नाहीत.

Natepute Pratinidhi
फडणवीसांचे सर्व डाव संपले
महाराष्ट्र

फडणवीसांचे सर्व डाव संपले

मराठा समाजाची कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत पुन्हा एकदा राज्य सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सडकून टीका केली आहे. "सत्तेचा गैरवापर करून मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्रे जाणीवपूर्वक रद्द केली जात आहेत. मात्र, फडणवीसांचे आता सर्व डाव संपले असून, आता माझा डाव सुरू होईल," असा उघड इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. सोलापूरच्या शिवाजी चौकात जरांगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे यांनी काही कागदोपत्री पुरावेही माध्यमांसमोर सादर केले.

Natepute Pratinidhi
शरद पवार गटाची मोठी राजकीय खेळी
सोलापूर जिल्हा

शरद पवार गटाची मोठी राजकीय खेळी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व खासदार येत्या सोमवारी राजधानी दिल्लीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली ही उच्चस्तरीय भेट होणार असून, संसदेत सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडणार आहे. राज्यातील विविध भागांत निर्माण झालेली गंभीर दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांसमोरील तीव्र अडचणी आणि केंद्र सरकारकडून मिळणारी मदत या पार्श्वभूमीवर ही भेट राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रस्थानी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची ओढ आणि पाण्याचा गंभीर तुटवडा यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

Natepute Pratinidhi
अजितदादांवर प्रेम होते म्हणूनच पवार साहेबांची साथ सोडली
महाराष्ट्र

अजितदादांवर प्रेम होते म्हणूनच पवार साहेबांची साथ सोडली

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत पक्षातील सद्य:स्थिती, नेत्यांमधील अंतर्गत मतभेद आणि राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या भेटीवर सविस्तर व स्पष्ट भाष्य केले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या आणि नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी सर्व कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना शांततेचे व एकजुटीचे आवाहन केले आहे. "घरामध्ये जसे मतभेद होतात, तसेच पक्षातही होतात; पण सर्वांना सोबत घेऊनच पुढे जावे लागते," असा मोलाचा सल्ला त्यांनी पक्षातील नेत्यांना दिला आहे. प्रशांत किशोरांच्या भेटीला फार महत्त्व न देण्याचा सल्ला राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती.

Natepute Pratinidhi
पुढील 100 वर्षे हेच कार्यालय आर्थिक व्यवस्थेचा कणा राहील
महाराष्ट्र

पुढील 100 वर्षे हेच कार्यालय आर्थिक व्यवस्थेचा कणा राहील

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज मुंबईत 'नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन'च्या (NUCFDC) नवनिर्मित कार्यालयाचे अधिकृत उद्घाटन पार पडले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना अमित शहा यांनी अर्बन बँकिंग क्षेत्राच्या आधुनिकीकरणावर भर दिला. ते म्हणाले, "आम्ही अर्बन बँकिंग क्षेत्राला अधिक विकसित करत असून बँकिंग सेवा आता पूर्वीपेक्षा अधिक आधुनिक होणार आहेत. या 'अम्ब्रेला' संस्थेमुळे अर्बन बँकिंगचा मोठा विस्तार होईल आणि पुढील 100 वर्षांपर्यंत हेच कार्यालय शेअर बाजाराचा कणा म्हणून काम करेल." तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात डिजिटल व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याचेही शाह यांनी यावेळी सांगितले.

Natepute Pratinidhi
सुप्रिया सुळेंनी सांगितले पंतप्रधानांशी भेटीचे नेमके कारण
महाराष्ट्र

सुप्रिया सुळेंनी सांगितले पंतप्रधानांशी भेटीचे नेमके कारण

"आम्ही महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आणि विकासकामांसाठी रीतसर वेळ मागून देशाच्या पंतप्रधानांची भेट घेणार आहोत. ते केवळ एका पक्षाचे पंतप्रधान नाहीत, तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीचे फोटोही आम्ही तुम्हाला नक्की देऊ," असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना सुळे यांनी केंद्र सरकारचे फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन ॲक्ट (FCRA) बिल, नीट परीक्षा वाद, महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी आणि 'जेन झी' आंदोलनावर सरकारला धारेवर धरले.

Natepute Pratinidhi
बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी सज्ज

श्री गणरायाचे आगमन 14 सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सज्ज झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातील कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाने यंदा 7 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत 5,220 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. गणेशोत्सवाच्या जादा वाहतुकीच्या नियोजनासंदर्भात एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच एसटीचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, "गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या भावविश्वाशी घट्ट जोडलेला सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा, कोकणातील रहिवासी आणि एसटी यांचे अतूट नाते आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही नफा-तोट्याचा विचार न करता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी सज्ज आहे. यंदा सुमारे 5,220 जादा बसेस कोकणातील विविध मार्गांवर धावणार आहेत."

Natepute Pratinidhi
LOCAL UPDATE

तुमच्याकडे परिसरातील बातमी आहे?

माहिती WhatsAppवर पाठवा. पडताळणीनंतर Natepute Expressवर प्रकाशित केली जाईल.

माहिती पाठवा