श्रावणमासानिमित्त वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी
श्रावणमासानिमित्त अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात यंदाही विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणातील चारही सप्ताहांत भागवत कथा, गीता पठण, कीर्तन, हरीपाठ व रामकथा यांसह विविध भक्तिमय कार्यक्रम होणार असून भाविकांना या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे. श्रावणमासाच्या पहिल्या सप्ताहात ह.भ.प. श्रीहरी महाराज रसाळ (अंबड, जि. जालना) यांच्या वाणीतून भागवत कथा सप्ताह होणार आहे. दुसऱ्या सप्ताहात ह.भ.प. मनोहर महाराज घोरपडे (महालिंगरायवाडी, धाराशिव) यांचे गीता पठण होईल.