Natepute Express
MARATHI NEWS

ताज्या मराठी बातम्या

वसमत तालुका हादरला:भोळसर चिमुकलीवर 50 रुपये अन् बिस्किटाचे आमिष दाखवून सामूहिक अत्याचार; 3 नराधमांना बेड्या
महाराष्ट्र

वसमत तालुका हादरला:भोळसर चिमुकलीवर 50 रुपये अन् बिस्किटाचे आमिष दाखवून सामूहिक अत्याचार; 3 नराधमांना बेड्या

LATEST STORIES

नवीन बातम्या

139 निकाल
वसमत तालुका हादरला:भोळसर चिमुकलीवर 50 रुपये अन् बिस्किटाचे आमिष दाखवून सामूहिक अत्याचार; 3 नराधमांना बेड्या
महाराष्ट्र

वसमत तालुका हादरला:भोळसर चिमुकलीवर 50 रुपये अन् बिस्किटाचे आमिष दाखवून सामूहिक अत्याचार; 3 नराधमांना बेड्या

वसमत तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. 13 वर्षांच्या एका भोळसर अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेत, तिला केवळ 50 रुपये आणि बिस्किटाचे आमिष दाखवून उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. या धक्कादायक प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात चार आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मतिमंद व भोळसर आहे. तिचे कुटुंबीय बाहेरगावी गेलेले असताना, गावातील तरुणांनी संधी साधून तिला दुचाकीवर बसवले आणि शेतात नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. कुटुंबीय घरी परतल्यानंतर मुलीचे वर्तन विचित्र वाटल्याने आधी तिला रुग्णालयात नेण्यात आले. घरी आल्यावर तिच्या कपड्यांवर चिखल साचल्याचे पाहून कुटुंबियांनी विचारपूस केली असता, तिघा नराधमांनी 50 रुपये व बिस्किटाचे आमिष दाखवून शेतात नेल्याचे तिने सांगितले. इतकेच नव्हे, तर काही दिवसांपूर्वी गावातीलच एका तरुणाने अशाच प्रकारे तिच्यावर जबरदस्ती केल्याची आपुलकीची कबुलीही मुलीने दिली.

Natepute Pratinidhi
जिल्ह्यात 1033 गावांसाठी 91 पर्जन्यमापक केंद्र
महाराष्ट्र

जिल्ह्यात 1033 गावांसाठी 91 पर्जन्यमापक केंद्र

अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने दडी मारली आहे. माळरानावरील खरीप पिकांनी माना टाकल्या आहेत. जिल्ह्यात असमान पाऊस पडतो. पावसाची नोंद मंडळनिहाय होते. मंडळात असलेल्या काही गावांमध्ये मोठा पाऊस तर काही ठिकाणी कोरडेठाक हवामान असते. जिल्ह्यातील 1033 ग्रामपंचायतींमध्ये 91 मंडळं आहेत. त्या मंडळांतील 91 पर्जन्यमापक यंत्रांद्वारे पाऊस मोजला जातो. त्यामुळे योग्य पद्धतीने पावसाचे मोजमाप होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनांचा, पीक विम्याचा लाभ घेण्यात अडचणी येत आहेत. प्रत्यक्ष पडलेला पाऊस आणि दप्तरी नोंदी यात पर्जन्यमापकांची संख्या कमी असल्याने विसंगती येत असल्याने अडचण होत आहे. ऑगस्ट महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील इतर दहा तालुक्यांपेक्षा मंगळवेढ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव, मारापूर ,मंगळवेढा या मंडळामध्ये केवळ दोन मोठे पाऊस झाल्याची नोंद प्रशासकीय कामकाजात केली आहे. शासनाच्या वतीने तालुक्यातील 7 महसुली मंडळात प्रत्येक ठिकाणी एक पर्जन्यमापक बसवले आहे. यावरच 81 गावांच्या पावसाची नोंद होते. त्यावरून त्या मंडळातील पावसाचे प्रमाण ठरवले जाते.

Natepute Pratinidhi
गणेशवाडीचा वीर जवान वैभव आवताडे जम्मू-काश्मीरमध्ये शहीद
सोलापूर जिल्हा

गणेशवाडीचा वीर जवान वैभव आवताडे जम्मू-काश्मीरमध्ये शहीद

मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी गावचे पुत्र वैभव आवताडे शहीद झाले आहेत. गणेश हे जम्मू-काश्मीरमध्ये मराठा रेजिमेंटमध्ये कर्तव्यावर होते. शुक्रवारी दुपारी 12.31 वाजता वैभव शहीद झाले असून रविवारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे शव विमानाने पुणे येथे शनिवारी रात्री 12:30 वाजता येणार असून, पहाटे तीन वाजता पुणे येथून संरक्षण दलाच्या वाहनातून निघणार आहे, रविवारी मंगळवेढा मध्ये सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास येणार आहे, त्यानंतर सजलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. मूळ गावी गणेशवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वैभव यांनी दि.13 ऑगस्ट रोजी गुरुवारी रात्री अकरा वाजता आई-वडील पत्नी यांच्याशी फोनवरून गप्पा मारल्या सगळे ठीक आहे ,तुम्ही ठीक आहात ना अशी विचारणा केली, सगळे गावाकडे शांत झोपी गेले, शुक्रवारी 12:31 दुपारी अचानक जम्मू येथील मुख्यालयातून फोन आला आणि आई-वडिलांसह गावकऱ्यांचा काळजाचा ठेका चुकला. वैभव आवताडे शहीद झाल्याची बातमी आली आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच गणेशवाडी गावासह तालुक्यावर शोककळा पसरली.

Natepute Pratinidhi
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला मोठा दणका
महाराष्ट्र

FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला मोठा दणका

आपल्या धडक कारवाईसाठी ओळखले जाणारे अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा थेट बॉलिवूडच्या बड्या स्टार्सकडे वळवला आहे. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या ‘विमल पान मसाला’ची 'सरोगेट' (अप्रत्यक्ष) जाहिरात केल्याप्रकरणी सुपरस्टार शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र एफडीएने (FDA) 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 'विमल पान मसाला' की 'विमल इलायची'? अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ हे तीनही अभिनेते 'विमल इलायची'च्या जाहिरातीत एकत्र झळकले होते. 'विमल इलायची'च्या नावाखाली प्रत्यक्षात 'विमल पान मसाला' या तंबाखू आणि निकोटीनयुक्त गुटख्याची अप्रत्यक्ष (Surrogate Advertising) जाहिरात केली जात असल्याचा ठपका एफडीएने ठेवला आहे. महाराष्ट्रात 13 जुलै 2026च्या सुधारित आदेशानुसार तंबाखू आणि निकोटीनयुक्त गुटखा आणि पान मसाल्याच्या उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर बंदी आहे.

Natepute Pratinidhi
मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टसाठी एल्गार
महाराष्ट्र

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टसाठी एल्गार

या सरकारने सगळ्यांवर अन्याय केला आहे. धनगरांवर अन्याय केला, मायक्रो ओबीसींचे वाटोळे केले, बंजारा समाजाचे वाटोळे केले, आदिवासींचा उद्ध्वस्त कार्यक्रम लावला आणि आता दलित-मुस्लिमांचाही कार्यक्रम लावून टाकला आहे. ही जी खदखद आहे, ती कुठेतरी बाहेर काढावी लागते. त्यासाठी मराठा समाजाने एकजूट असणे खूप महत्त्वाचे आहे, असा घणाघाती आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांनी आज (16 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकार, चंद्रशेखर बावनकुळे, संजय शिरसाट आणि मराठा समाजाच्या पुढील रणनीतीवर सविस्तर भाष्य केले. बावनकुळे आणि शिरसाटांचा जातीय तेढ निर्माण करण्याचा डाव चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांच्यावर थेट निशाणा साधत जरांगे पाटील म्हणाले, "बावनकुळे आणि शिरसाट यांनी मराठा समाज उद्ध्वस्त करण्याचे ठरवले आहे. त्यांनी जो जातीय तेढ निर्माण केलाय आणि मराठ्यांवर जो अन्याय करण्याचे ठरवले आहे, तो आपल्याला मोडून काढावाच लागेल.

Natepute Pratinidhi
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर त्यांचे प्राण वाचले असते
महाराष्ट्र

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर त्यांचे प्राण वाचले असते

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. राहुल गांधींना आलेली नोटीस, स्वातंत्र्यदिनाचे भाषण, 'वंदे मातरम'चा मुद्दा आणि गोपीनाथ मुंडे यांच्या भाजपमधील प्रवासावर राऊतांनी खळबळजनक विधाने केली आहेत. राज्यात आणि देशात शोधून शोधून 'इडियट्स' गोळा करून सरकार चालवले जात असल्याचा घणाघात त्यांनी केला. "हे तर इडियट कॅबिनेट, करा माझ्यावर तक्रार" सातारा येथील मंत्र्याबाबत (जयकुमार गोरे) बोलल्यामुळे आपल्याला नोटीस आल्याचे सांगत राऊत म्हणाले, "जर 'इडियट' हा शब्द असंसदीय असेल, तर सेन्सॉर बोर्डाने त्यावर बंदी आणली पाहिजे. भाजपच्या लोकांना इडियट का म्हटले जाते, हे लोक रोज पाहतात. देशात आणि महाराष्ट्रात शोधून शोधून इडियट लोक एकत्र आणले आहेत आणि त्यांना कॅबिनेट व राज्यमंत्री केले आहे.

Natepute Pratinidhi
सरकार ओबीसीविरोधी भूमिका घेतंय:विजय वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका
महाराष्ट्र

सरकार ओबीसीविरोधी भूमिका घेतंय:विजय वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत चर्चा सुरू असतानाच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “ओबीसीला संपवण्याचा विळा सरकारने उचलला आहे. सरकारची भूमिका ओबीसीविरोधी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे,” असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला. नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी जातनिहाय जनगणना, ओबीसींच्या प्रमाणपत्रांचा मुद्दा आणि सरकारच्या ओबीसी उपसमितीच्या बैठकांवरून सरकारला लक्ष्य केले. जात लिहिल्याने अर्धी लढाई जिंकली कशी? जातनिहाय जनगणनेच्या संदर्भात बोलताना वडेट्टीवार यांनी काही नेत्यांकडून करण्यात आलेल्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केला.

Natepute Pratinidhi
मी कोणत्याही प्रस्थापिताच्या सुपारीवर राजकारण करत नाही
महाराष्ट्र

मी कोणत्याही प्रस्थापिताच्या सुपारीवर राजकारण करत नाही

शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि कोविड काळात पैसे लाटल्याचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांना आता जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले आहे. "मी एका सामान्य शेतकऱ्याचा आणि रेशन दुकानदाराचा मुलगा असून, कोणत्याही प्रस्थापितांच्या मेहरबानीवर किंवा कुणाच्या सुपारीवर मी राजकारण करत नाही. मी प्रस्थापितांच्या विरोधात लढून इथपर्यंत आलो आहे," असा जोरदार पलटवार आमदार गोरे यांनी केला आहे. सुषमा अंधारेंना चुकीचे ब्रीफिंग दिले जात आहे सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना गोरे म्हणाले, "त्या माझ्या भगिनी आहेत आणि मी त्यांचा सन्मान करतो. पण मला असे वाटते की त्यांना अत्यंत चुकीची माहिती दिली जात आहे. जो माणूस सामान्य कुटुंबातून येऊन राज्यात काम करतो, त्याने इथपर्यंत पोहोचण्यासाठी काय यातना भोगल्या आहेत, याचा विचार त्यांनी करायला हवा होता.

Natepute Pratinidhi
पर्यावरणाला टिकवून ठेवणाऱ्या वनस्पतींचे संवर्धन गरजेचे
सोलापूर जिल्हा

पर्यावरणाला टिकवून ठेवणाऱ्या वनस्पतींचे संवर्धन गरजेचे

मानवी जीवन निरोगी जगण्यासाठी निसर्गाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, तसेच पर्यावरणाला जपणाऱ्या वनस्पतींचेही जतन झाले पाहिजे, असे प्रतिपादन वनस्पती शास्ञाचे अभ्यासक डॉ भगवान वाघमारे यांनी केले. लातूर येथे कलापंढरी सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालूका स्तरीय वातावरण बदल आणि त्याचे दुष्परिणाम प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कलापंढरी संस्थेचे अध्यक्ष बी पी सुर्यवंशी,शिवदर्शन सदाकाळे,असमा शेख,आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना वाघमारे म्हणाले की बियाणे जमीनीत गाढून घेते जमीन फाडून वर येते आणि सर्वांसाठी ऑक्सीजन निर्माण करते.या बिया सारखे प्रत्येकांनी घडले पाहिजे स्वतःला गाढून घेऊन इतरांसाठी जगण्यासाठी ऑक्सिजन देते.प्रतेकांच्या गरजा आज वाढल्या आहेत सर्व काही मिळालं आणि ऑक्सीजन जर मिळाले नाही तर काय होईल.

Natepute Pratinidhi
वाढवणा परिसरात जनावरे चोरणारी टोळी जेरबंद
सोलापूर जिल्हा

वाढवणा परिसरात जनावरे चोरणारी टोळी जेरबंद

शेतकरीबांधवांनी कष्टाने जोपासलेल्या जनावरांवर डल्ला मारून त्यांची जनावरे चोरणारी टोळीला पकडण्यात वाढवणा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्याकडून एक लाख रुपयांची रोकड तसेच चोरीकरिता वापरण्यात आलेली बोलेरो पिकअप असा एकूण साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर संजीव मूसळे रा.चिद्रेवाडी, बालाजी गंगाराम नादरगे रा.डोंगरशेळकी या शेतकऱ्यांनी जनावरे चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती. त्यानंतर वाढवणा हद्दीत सातत्याने घडणाऱ्या जनावरे चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलिस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण,पोलीस उपाधिक्षक अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनात वाढवणा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा.पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.

Natepute Pratinidhi
निलंग्यात निघालेल्या बाईक रॅलीत डौलाने फडकला तिरंगा
सोलापूर जिल्हा

निलंग्यात निघालेल्या बाईक रॅलीत डौलाने फडकला तिरंगा

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानाला व्यापक स्वरूप देण्यासाठी निलंगा शहरात महसूल व नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी दि. 14 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात तिरंगा ध्वज आणि वाहनांवर डौलाने फडकणाऱ्या राष्ट्रध्वजासह अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने संपूर्ण शहरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले. उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, गटविकास अधिकारी सतीश पाटील व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले. सकाळी 10 वाजता निलंगा तहसील कार्यालयाच्या परिसरातून रॅलीला उत्साहात सुरुवात झाली. विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी तिरंगा ध्वज घेऊन दुचाकींवर सहभागी झाले होते. रॅलीने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत लांबोटा येथील वन परीक्षेत्र गाठले. यावेळी तिरंगा ध्वज, देशभक्तीपर घोषणा आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या संदेशामुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले. महसूल विभाग, नगरपरिषद प्रशासन तसेच पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले

Natepute Pratinidhi
कळंबवाडी-पानगाव, आणि पिंपळगाव रस्ता दुरुस्त करा
सोलापूर जिल्हा

कळंबवाडी-पानगाव, आणि पिंपळगाव रस्ता दुरुस्त करा

बार्शी तालुक्यातील कळंबवाडी (पा.) ते पानगाव तसेच कळंबवाडी (पा.) ते ढाळे पिंपळगाव या दोन्ही रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी ॲड. विकास जाधव यांनी 15 ऑगस्टपासून बार्शी तहसील कार्यालयापुढे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटले की, कळंबवाडी (पा.) ते पानगाव या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच कळंबवाडी (पा.) ते ढाळे पिंपळगाव या रस्त्याचे कामही अपूर्ण अवस्थेत असून, काही ठिकाणी केवळ खडी अंथरून रस्ता सोडण्यात आला आहे. या रस्त्याच्या कामासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेली असतानाही काम पूर्ण झाले नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Natepute Pratinidhi
LOCAL UPDATE

तुमच्याकडे परिसरातील बातमी आहे?

माहिती WhatsAppवर पाठवा. पडताळणीनंतर Natepute Expressवर प्रकाशित केली जाईल.

माहिती पाठवा