Natepute Express
MARATHI NEWS

ताज्या मराठी बातम्या

महिंद्रा BE6 स्पोर्ट EQ 15 ऑगस्टला लॉन्च होईल
शिक्षण व तंत्रज्ञान

महिंद्रा BE6 स्पोर्ट EQ 15 ऑगस्टला लॉन्च होईल

LATEST STORIES

नवीन बातम्या

139 निकाल
महिंद्रा BE6 स्पोर्ट EQ 15 ऑगस्टला लॉन्च होईल
शिक्षण व तंत्रज्ञान

महिंद्रा BE6 स्पोर्ट EQ 15 ऑगस्टला लॉन्च होईल

महिंद्राची नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही BE6 स्पोर्ट EQ तीन स्क्रीन सेटअपसह येईल. कंपनीने कारचा पहिला टीझर जारी केला आहे, ज्यात अनेक मोठे अपडेट्स समोर आले आहेत. कंपनी 15 ऑगस्ट रोजी कार लॉन्च करेल. महिंद्रा BE6 ची एक्स-शोरूम किंमत 18.90 लाख रुपयांपासून सुरू होऊन 26.90 लाख रुपयांपर्यंत जाते. भारतात याची स्पर्धा MG ZS EV, Hyundai Creta Electric, Tata Sierra EV, VinFast VF7, Maruti E-Vitara आणि Toyota Ebella सारख्या गाड्यांशी आहे. एक्सटीरियरमध्ये नवीन मॅट ग्रे शेड मिळेल टीझरवरून असे दिसून येते की BE6 च्या या नवीन व्हर्जनमध्ये अनेक एक्सटीरियर अपग्रेड्स पाहायला मिळतील. गाडीला एक नवीन मॅट ग्रे शेड देण्यात आली आहे, जी तिचा स्पोर्टी आणि स्पेस-एज लुक आणखी चांगला बनवते. इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये पहिल्यांदाच 3 स्क्रीन सेटअप इलेक्ट्रिक SUV मध्ये सर्वात मोठा बदल तिच्या केबिनमध्ये दिसेल. महिंद्राच्या इतर बॉर्न-इलेक्ट्रिक SUV मध्ये मिळणारे 3-स्क्रीन सेटअप आधी BE 6 मध्ये नव्हते, पण आता हे फीचर त्यात मिळेल.

Natepute Pratinidhi
एआय मॉडेलमध्ये निर्देशांशिवाय भ्रामक वर्तनाचा अनोखा प्रकार
शिक्षण व तंत्रज्ञान

एआय मॉडेलमध्ये निर्देशांशिवाय भ्रामक वर्तनाचा अनोखा प्रकार

एआय आता फक्त प्रश्नांची उत्तरे देण्यापुरते किंवा सामग्री तयार करण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. ब्रिटनच्या एआय सिक्युरिटी इन्स्टिट्यूट (एआयएसआय) च्या एका चाचणीत दोन प्रगत एआय मॉडेल्सनी असे वर्तन केले, ज्यामुळे तज्ञांची चिंता वाढली. चाचणीदरम्यान, अँथ्रोपिकच्या मायथोस एआयने मानवी बनावट ऑनलाइन ओळख तयार केली. नंतर खासगी संदेश पाठवले आणि लोकांना विश्वासात घेऊन ‘गिटहब’ प्रणालीमध्ये हानीकारक कोड टाकण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्याच्या हालचालींवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, तेव्हा त्याने आपले जुने रेकॉर्ड सामान्य दिसण्यासाठी त्यात बदल केले आणि नवीन ओळख स्वीकारण्याचाही विचार केला. एखाद्या एआय मॉडेलमध्ये कोणत्याही सूचनेशिवाय इतके स्पष्ट स्वायत्त आणि भ्रामक वर्तन दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Natepute Pratinidhi
रेडमी नोट 17 स्मार्टफोन 8,000mAh बॅटरीसह लॉन्च
शिक्षण व तंत्रज्ञान

रेडमी नोट 17 स्मार्टफोन 8,000mAh बॅटरीसह लॉन्च

शाओमीने भारतात आपला नवीन मिड-रेंज स्मार्टफोन रेडमी नोट 17 लॉन्च केला आहे. या फोनमध्ये 8,000mAh ची मोठी बॅटरी, स्नॅपड्रॅगन 4 जेन 4 चिपसेट आणि 6.9-इंचचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनची सुरुवातीची किंमत 27,999 रुपये आहे. याची विक्री 12 ऑगस्टपासून सुरू होईल. व्हेरिएंटनुसार किमती आणि बँक ऑफर्स कंपनीने रेडमी नोट 17 भारतीय बाजारात दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे: ग्राहकांना क्रेडिट कार्ड्सवर ₹3,000 पर्यंत त्वरित सवलत मिळेल. याची विक्री 12 ऑगस्टपासून शाओमीच्या अधिकृत वेबसाइट, ॲमेझॉन आणि अधिकृत रिटेल स्टोअर्सवर सुरू होईल. फोन आर्कटिक ब्लू, स्टारलाइट पर्पल आणि डार्क नाईट कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल. डिझाइन आणि डिस्प्लेची वैशिष्ट्ये रेडमी नोट 17 मध्ये फ्लॅट कडा आणि फ्लॅट मागील पॅनेलसह नवीन रिफ्रेश डिझाइन आहे. मागील पॅनेलवर स्क्वेअर-आकाराचा कॅमेरा मॉड्यूल आहे.

Natepute Pratinidhi
शिक्षण संस्थेची झडती; सोमवारपासून तपासणी
सोलापूर जिल्हा

शिक्षण संस्थेची झडती; सोमवारपासून तपासणी

कथित भोंदूबाबा मनोहरमामा भोसले यांच्याशी आर्थिक संबंध असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर भिगवण येथील एका शिक्षण संस्थेत करमाळा पोलिसांकडून सोमवारी रात्रीपासून चौकशी व कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. मात्र, पोलिसांनी अद्याप या कारवाईबाबत अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, करमाळा पोलिसांचे पथक सोमवारी रात्री भिगवण जवळील शिक्षण संस्थेच्या परिसरात दाखल झाले. त्यानंतर संस्थेतील कार्यालयीन कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांशी संबंधित नोंदी, संगणकीय माहिती तसेच अन्य संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी ही सकाळपासून रात्री उशिरा पर्यंतही पोलिसांची संस्थेतील उपस्थिती कायम होती. तसेच संस्थेशी संबंधित प्रा. राजेंद्र हुंबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

Natepute Pratinidhi
‘बाप समजून घेताना’ व्याख्यानामधून विद्यार्थ्यांना वडिलांच्या त्यागाची जाणीव
सोलापूर जिल्हा

‘बाप समजून घेताना’ व्याख्यानामधून विद्यार्थ्यांना वडिलांच्या त्यागाची जाणीव

आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवून आयुष्यभर कष्ट करणाऱ्या वडिलांची किंमत मुलांनी ओळखली पाहिजे, या आशयाच्या विचारांनी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनाला स्पर्श केला. त्यांच्या भावनिक आणि प्रेरणादायी विचारांनी अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. वडिलांच्या कष्टांची जाणीव करून देणारे हे व्याख्यान विद्यार्थ्यांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवून गेले. जवळगाव दत्तगुरु शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जवळगाव नं. 2 येथे ‘बाप समजून घेताना’ या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांच्या ओघवत्या आणि प्रभावी वक्तृत्वाने उपस्थित विद्यार्थी भावूक झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाज मुलानी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

Natepute Pratinidhi
महिलांनी संविधानिक हक्कांची जाणीव करून घ्यावी
सोलापूर जिल्हा

महिलांनी संविधानिक हक्कांची जाणीव करून घ्यावी

संविधानाने महिलांना दिलेले अधिकार व हक्क यांची जाणीव महिलांना झाल्याशिवाय त्या सामाजिक बंधनातून पूर्णपणे मुक्त होणार नाहीत. घरातील परंपरा, कर्मकांडे, श्रद्धा, व्रत-वैकल्ये, उपवास-तापास यांसारख्या प्रथा महिलांनी स्वीकारल्या आहेत. त्यामुळे या प्रथा वर्षानुवर्षे नव्हे तर शतकानुशतके चालत आल्या आहेत. मात्र,त्यांचा चिकित्सक विचार करून महिलांनी स्वतःला या बंधनातून कधी मुक्त करणार असल्याचे प्रतिपादन अंनिसच्या संविधान जागर राज्य समन्वयक तथा मानवी हक्क व लैंगिक न्याय कार्यकर्त्या ॲड. परिक्रमा खोत यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) स्थापना दिन व क्रांती दिनानिमित्त मोहोळ शाखेच्या वतीने ‘महिलांशी सुसंवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि. 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच दरम्यान करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. मोहोळ अर्बन को-ऑप.बँकेच्या माजी अध्यक्षा संगिता फाटे अध्यक्षीय भाषणात संगिता फाटे यांनी उपवासाच्या प्रथेबाबत भाष्य केले.

Natepute Pratinidhi
शाळा, कॉलेजातील 300 विद्यार्थिनींनी सादर केली पारंपरिक नागपंचमीची गाणी
सोलापूर जिल्हा

शाळा, कॉलेजातील 300 विद्यार्थिनींनी सादर केली पारंपरिक नागपंचमीची गाणी

लाट्या बाई लाट्या.. चंदनी लाट्या, फू-बाई फू फुगडी फू..., काटवट कणा.., खिस बाई खिस... दोडका खिस, पिंगा गं पोरी पिंगा..., पावसाचं पाणी कवलात, पाटलाची लेक मी डौलात.., नाच गं घुमा कशी मी नाचू... अशा पारंपरिक गाण्यांवर विद्यार्थिनींच्या पावलांनी ठेका धरला. त्यानंतर उखाण्यांच्या जुगलबंदीने रत्नाई पारंपरिक नृत्य स्पर्धेत रंग भरले. अकलूज येथे संपन्न झालेल्या रत्नाई पारंपरिक नागपंचमी शालेय समूह नृत्य स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत महर्षी प्रशालेने एक लाखाचे पहिले बक्षीस पटकावले. सदाशिवराव माने विद्यालय व लक्ष्मीबाई कन्या प्रशाला आणि जिजामाता कन्या प्रशाला यांना विभागून द्वितीय क्रमांक पटकावला. तर उर्वरित तीन विद्यालयांना प्रत्येकी प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजन केले. शिक्षण प्रसारक मंडळ व प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजन केले होते. अकलूजमधील चार प्रशाला व तीन महाविद्यालयांतील सुमारे 300 विद्यार्थिनींनी पारंपरिक गाणी सादर केली. उद्घाटन सुलक्षणादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते केले.

Natepute Pratinidhi
दुरुस्तीनंतर 6 महिन्यांत बबलाद शाळेचे प्लास्टर कोसळल्याने 13 विद्यार्थी जखमी
सोलापूर जिल्हा

दुरुस्तीनंतर 6 महिन्यांत बबलाद शाळेचे प्लास्टर कोसळल्याने 13 विद्यार्थी जखमी

अक्कलकोट सहा महिन्यांपूर्वी अर्धवट दुरुस्त केलेल्या बाबलाद (ता. अक्कलकोट) येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेच्या छताचा प्लास्टरचा काही भाग कोसळून दोन शिक्षकांसह 13 विद्यार्थी जखमी झाले. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याबाबतची अधिक माहिती अशी, बबलाद (ता. अक्कलकोट) येथे जिल्हा परिषदेची कन्नड शाळा आहे. ही इमारत जीर्ण झाली असून, सहा महिन्यांपूर्वी तात्पुरती डागडुजी केली होती. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढली होती. नंतर ते विद्यार्थी शाळेत आले आणि शाळेतील व्हरांड्यात थांबून 15 ऑगस्टच्या ध्वजवंदन कार्यक्रमाची तयारी करत होते.

Natepute Pratinidhi
राज्यात पावसाचे पुन्हा कमबॅक:मुंबईसह 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट
महाराष्ट्र

राज्यात पावसाचे पुन्हा कमबॅक:मुंबईसह 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यात मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रासह देशातील तब्बल 19 राज्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे. रात्रीपासूनच राज्याच्या अनेक भागांत पावसाची संततधार सुरू आहे. कुठे कोणता अलर्ट? (राज्यातील पावसाची स्थिती) हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी आज सतर्कतेचे इशारे जारी केले आहेत. ऑरेंज अलर्ट: पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहणार असल्याने येथे 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. यलो अलर्ट: मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणपट्ट्यासह नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांवर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, या 9 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

Natepute Pratinidhi
टीईटी पेपरफुटीचे सोलापूर कनेक्शन
सोलापूर जिल्हा

टीईटी पेपरफुटीचे सोलापूर कनेक्शन

‘टीईटी’ पेपर फुटी प्रकरणाचे कनेक्शन आता सोलापूरपर्यंत आल्याचे उघड झाले आहे. भिवंडी पोलिसांनी आतापर्यंत 16 जणांना अटक केली आहे. त्यापैकी काहींच्या जबाबातून सोलापूरमधील पोलिस भरती पूर्वप्रशिक्षण केंद्राचा चालक प्रकाश पवार (रा. सोरेगाव) याचाही रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पवारला अटक करण्यात आली. मुख्य सूत्रधारांना परीक्षार्थींची कागदपत्रे पुरवल्याचा त्याच्यावर ठपका आहे. न्यायालयाने त्याला 15 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. त्याच्याकडे 26 विद्यार्थ्यांचे पेपर सापडले, त्यामध्ये 20 उत्तीर्ण झालेल्यांचे पेपर आढळून आले. त्यापैकी 5 पेपर टीईटी उत्तीर्ण झालेल्यांचे असल्याचा संशय आहे. रॅकेटचे नेटवर्क तीन- चार राज्यांत पोलिस पाळेमुळे खोदण्यात व्यग्र 28 जून रोजी महाराष्ट्रात टीईटीची परीक्षा होणार होती. मात्र त्यापूर्वीच ठाणे, भिवंडीत 27 जून रोजीच हा पेपर फुटला. त्यामुळे परीक्षाच रद्द करण्यात आली, ती अजून झाली नाही. उमेदवार त्याची वाट पहात आहेत.

Natepute Pratinidhi
राज ठाकरे सकाळीच थेट 'वर्षा'वर
महाराष्ट्र

राज ठाकरे सकाळीच थेट 'वर्षा'वर

गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी भाजप आणि महायुतीवर सातत्याने टीका करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सकाळी 8.20 वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे यांचा ताफा मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर पोहोचला. भाजपवर आक्रमक भूमिका घेत असतानाच राज ठाकरेंनी घेतलेल्या या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. भेटीचे प्रमुख कारण काय? राज ठाकरे यांच्यासोबत या भेटीत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) अध्यक्ष अजिंक्य नाईक हेदेखील उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, ही कोणतीही अचानक झालेली राजकीय भेट नसून दोन दिवसांपूर्वीच ठरलेली पूर्वनियोजित भेट होती.

Natepute Pratinidhi
घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली:2 जणांचा मृत्यू; 5 ते 6 जण ढिगाऱ्याखाली
महाराष्ट्र

घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली:2 जणांचा मृत्यू; 5 ते 6 जण ढिगाऱ्याखाली

मुंबईत रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटकोपर-साकीनाका परिसरात एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली आहे. येथील चिरागनगर परिसरात गौसिया चाळीवर अचानक डोंगराचा मोठा कडा (दरड) कोसळल्याने दोन ते तीन घरे ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, आणखी 5 ते 6 जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पहाटेच्या गाढ झोपेतच काळ आला! स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रभर पावसाचा जोर कायम होता. याच दरम्यान, पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास अचानक डोंगराचा काही भाग खचला आणि माती, तसेच दगडांचे मोठे ढिगारे खाली असलेल्या दोन-तीन घरांवर येऊन कोसळले. सर्वजण गाढ झोपेत असतानाच हा प्रकार घडल्याने घरातील नागरिकांना जीव वाचवून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.

Natepute Pratinidhi
LOCAL UPDATE

तुमच्याकडे परिसरातील बातमी आहे?

माहिती WhatsAppवर पाठवा. पडताळणीनंतर Natepute Expressवर प्रकाशित केली जाईल.

माहिती पाठवा