संविधानातून टिपू सुलतानचा फोटो काढून दाखवा- जलील
कुठे वंदे मातरम तर कुठे टिपू सुलतान यांच्या फोटोबद्दल बोलून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. निवडणुका आल्या की असे मुद्दे उपस्थित करून निवडणुका जिंकायची हे भाजपचे सूत्र आहे. असे प्रश्न उचलण्यापेक्षा दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईबद्दल भाजपने बोलावे, असा सल्ला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिला. बुधवारी सोलापुरातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मालेगावमध्ये उपमहापौरांनी टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यामुळे वाद उद्भवला होता. याबाबत पत्रकारांनी लक्ष वेधले असता इम्तियाज जलील म्हणाले, ‘ज्या संविधानावर आपला भारत देश जिवंत आहे, चालत आहे त्या संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये डॉ. बाबासाहेबांनीच राणी लक्ष्मीबाई आणि टिपू सुलतान यांचे फोटो लावले आहेत. ही मूळ प्रत लोकसभेत आहे. हिंमत असेल तर या संविधानातून यांचे फोटो काढून दाखवावे,’ असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले. नांदेड, धुळे व सोलापूर मनपात विरोधी पक्षनेतेपद एमआयएमला मिळवण्यासाठी हायकोर्टात जाऊ, असा इशाराही त्यांनी या वेळी बोलताना दिला. राज्यात संघटनवाढीवर आमच्या पक्षाचा आहे भर राज्यात संघटनवाढीवर आमच्या पक्षाचा भर आहे.