राज्यात 55 कोटींचे 28 लाखकिलो बनावट पनीर केले जप्त
आरोग्याशी खेळणाऱ्या आणि अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. राज्यात 30 जुलै 2026 पासून अॅनालॉग अर्थात नॉन-डेअरी (कृत्रिम) पनीरच्या उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर एका वर्षासाठी पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुंढे म्हणाले, राज्यभरातून 308 ठिकाणांवरून पनीरचे नमुने घेतले होते. या तपासणीत तब्बल 35 टक्के नमुने आरोग्यास अत्यंत घातक आढळले आहेत.