Natepute Express
MARATHI NEWS

ताज्या मराठी बातम्या

बार्शीच्या गौरी मुखवट्यांची लंडन, अमेरिकेसह जपानला भूरळ
महाराष्ट्र

बार्शीच्या गौरी मुखवट्यांची लंडन, अमेरिकेसह जपानला भूरळ

LATEST STORIES

नवीन बातम्या

72 निकाल
बार्शीच्या गौरी मुखवट्यांची लंडन, अमेरिकेसह जपानला भूरळ
महाराष्ट्र

बार्शीच्या गौरी मुखवट्यांची लंडन, अमेरिकेसह जपानला भूरळ

बार्शीच्या मातीत साकारलेल्या अप्रतिम कलेची मोहिनी आता थेट सातासमुद्रापार पोहोचली आहे. येथील ज्येष्ठ मूर्तिकार राजाभाऊ उर्फ अनंत माणिकराव उपरे यांच्या हातांतून साकारलेले रेखीव, मोहक आणि भावपूर्ण महालक्ष्मीचे मुखवटे आता महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता जागतिक पटलावर पोहोचले आहेत. लंडन आणि अमेरिकेनंतर यंदा या मुखवट्यांची कीर्ती थेट जपानपर्यंत पोहोचली असून, यंदाचे महालक्ष्मीचे मुखवटे जपानमधील भाविकांसाठी रवाना झाले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बार्शीतील कलावंतांनी जपलेली ही गौरी-गणपती परंपरेची आंतरराष्ट्रीय ओळख आता अधिकच अधोरेखित झाली आहे. विविध आकार, आकर्षक भावमुद्रा आणि मुद्रांमधील बारकाई टिपत केलेली कलाकुसर ही उपरे यांच्या मुखवट्यांची खासियत आहे. दोन फुटांपासून साडेचार फुटांपर्यंत विविध आकारांमध्ये महालक्ष्मीचे मुखवटे उपलब्ध आहेत. त्यासोबत कापडी हात, कापसाची हाफ बॉडी, फायबर बॉडी आणि पूजेसाठी आवश्यक सजावटीचे साहित्य यांचीही मोठी विविधता येथे पाहायला मिळते.

Natepute Pratinidhi
पार्थ पवारांना मुंढवा जमीन घोटाळ्यात आरोपी का केले नाही?
महाराष्ट्र

पार्थ पवारांना मुंढवा जमीन घोटाळ्यात आरोपी का केले नाही?

पुण्यातील मुंढवा येथील 40 एकर शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यसभा सदस्य पार्थ पवारांच्या भूमिकेबाबत मुंबई हायकोर्टाने राज्य पोलिसांना धारेवर धरले. संबंधित कंपनीत भागीदार असतानाही पवार यांना या प्रकरणात अद्याप आरोपी का केले नाही, असा रोखठोक सवाल उपस्थित केला. याप्रकरणी पोलिस महासंचालक आणि तपास अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देत न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी 28 सप्टेंबर रोजी निश्चित केली आहे. एकाला आरोपी केले, मग दुसऱ्याला सूट का? : हायकोर्टाची पोलिसांना विचारणा संबंधित कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील यांना आरोपी केले असताना त्याच कंपनीचे भागीदार पार्थ पवार यांना आरोपी का केले नाही? त्यांच्यावर कारवाई का झाली नाही?” अशी थेट विचारणा न्यायालयाने केली. तसेच पार्थ पवार यांच्या या संपूर्ण व्यवहारातील भूमिकेबाबत पोलिसांचे नेमके काय म्हणणे आहे याचे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश कोर्टाने तपास यंत्रणेला दिले.

Natepute Pratinidhi
एमपीएससीची गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पडली लांबणीवर:25 ऑक्टोबरऐवजी 3 जानेवारी 2027 ला होणार
महाराष्ट्र

एमपीएससीची गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पडली लांबणीवर:25 ऑक्टोबरऐवजी 3 जानेवारी 2027 ला होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणारी गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली असून, आता ती 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. पेपरफुटी आणि निकालांतील गोंधळाच्या आरोपांवरून विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या तीव्र असंतोषाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे उमेदवारांना तयारीसाठी अतिरिक्त वेळही मिळणार आहे. पारदर्शकतेच्या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन करत आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार व सचिवांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. संभाजीनगरातही दोन दिवसांपूर्वी निदर्शने करण्यात आली होती. आमदार रोहित पवार यांनीही आंदोलनात सहभाग घेत आयोगाच्या कारभारावर जोरदार टीका केली.

Natepute Pratinidhi
उपवर्गीकरण आंदोलन:उपवर्गीकरण आमचा हक्क, ते व्हावेच; स्पर्धा‎परीक्षांमध्येही गुणवत्ता सिद्ध करा- प्रा. ढोबळे‎
महाराष्ट्र

उपवर्गीकरण आंदोलन:उपवर्गीकरण आमचा हक्क, ते व्हावेच; स्पर्धा‎परीक्षांमध्येही गुणवत्ता सिद्ध करा- प्रा. ढोबळे‎

सोलापूर अनुसूचित जातीच्या आरक्षणात अ, ब, क, ड उपवर्गीकरण मिळवणे हा आपला हक्क आहेच, मात्र मिळालेल्या सवलतींचा खरा लाभ घेण्यासाठी समाजाने शिक्षणाची आणि स्पर्धा परीक्षांची कास धरली पाहिजे. मातंग समाजाला आरक्षण मिळवून देण्याची आणि उपवर्गीकरणाचा तिढा सोडवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. पण शिक्षण आणि ज्ञान असेल तरच मिळालेल्या न्याय्य आरक्षणाचा उपयोग होईल. जर आपण मुलांना शिकवले नाही, तर समाज पुन्हा शंभर वर्षे मागे फेकला जाईल. आरक्षण मिळाले तरी केवळ घोषणा देऊन भागत नाही. मातंग समाजातील मुलांनी स्पर्धा परीक्षांमध्ये उतरले पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि प्रशासनात स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली पाहिजे, असे आवाहन माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी बुधवारी केले. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रमुख मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. हा मोर्चा नवीवेस पोलिस चौकी, लोकशाही अण्णाभाऊ साठे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिद्धेश्वर मंदिरमार्गे पुनम गेटवर आला.

Natepute Pratinidhi
श्री शहाजी प्रशालेत विद्यार्थ्यांना शालेय कामकाजाची अनुभूती
महाराष्ट्र

श्री शहाजी प्रशालेत विद्यार्थ्यांना शालेय कामकाजाची अनुभूती

येथील मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेला 139 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असून या प्रशालेत तुम्ही शिक्षण घेत आहात ही भाग्याची गोष्ट आहे. शाळा व शिक्षक जीवनाला आकार देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्याचा आपण सकारात्मक उपयोग करून घ्यावा, असे उदगार मुख्याध्यापक वाय.पी.कबाडे यांनी काढले. येथील मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेत शिक्षक दिनाचे औचित्य विद्यार्थी शिक्षक दिन उपक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक वाय.पी.कबाडे, एम. बी. मुन्नोळी, ए.एस.कोरे, एस. व्ही. गोडसे, आर. एम. इंगळे, जे. एस. बगले, ए. बी.शिंदे , मुख्याध्यापक मनस्वी कुलकर्णी, उपमुख्याध्यापक भागवंती देसाई, पर्यवेक्षक समीक्षा भांगरे, संस्कृती पगुडवाले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थी क्रीडा शिक्षकाने शालेय प्रार्थना घेतली. इयत्ता सातवी व इयत्ता दहावी मधील विद्यार्थिनींनी विद्यार्थी शिक्षक म्हणून शाळा चालवली. यामध्ये सर्व शालेय कामकाजाची माहिती घेतली. उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थी शिक्षक यांचा भेटवस्

Natepute Pratinidhi
पानगावात आदर्श शिक्षकांचा पुरस्काराने गौरव
महाराष्ट्र

पानगावात आदर्श शिक्षकांचा पुरस्काराने गौरव

बार्शी तालुक्यातील पानगाव येथे शहीद जवान स्मारक बहुउद्देशीय संस्था व माजी सैनिक संघटना उपशाखा पानगाव यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवले. तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण समारंभ जिल्हा परिषद शाळेत उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी सरपंच अंकुश मोरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी तालुका माजी सैनिक संघटनेचे माजी अध्यक्ष सुभेदार हरिश्चंद्र नवले, जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार काळे, उपसरपंच रोहिणी जमदाडे, माजी सरपंच मनोज पाटील, दत्तात्रय काळे, तंटामुक्ती अध्यक्ष अप्पासाहेब कानगुडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व पानगाव येथील भूमिपुत्र देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

Natepute Pratinidhi
उसाचा दुसरा हप्ता 300 रुपये द्यावा, ‘स्वाभिमानी’ची कारखान्यांकडे मागणी:‘सहकार महर्षी’‎,‘ सहकार शिरोमणी’श्री पांडुरंगला दिले निवेदन‎
महाराष्ट्र

उसाचा दुसरा हप्ता 300 रुपये द्यावा, ‘स्वाभिमानी’ची कारखान्यांकडे मागणी:‘सहकार महर्षी’‎,‘ सहकार शिरोमणी’श्री पांडुरंगला दिले निवेदन‎

माळशिरस तालुक्यासह राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन 300 रुपये दुसरा हप्ता तातडीने अदा करावा. तसेच काही कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे पहिला हप्ता अद्याप दिला नसेल तर तोही तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांनी केली. सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन मोहिते यांना संघटनेने निवेदन दिले. यावेळी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, भाळवणी, श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपूर, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना, गुरसाळे, विजय शुगर फॅक्टरी, करकंब, या साखर कारखान्याच्या व्यवस्थापनासही निवेदन देण्यात आले. यंदा रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरीचा उत्पादन खर्च वाढल्याने दुस-या हप्त्याची मागणी केली आहे. यावेळी ऊस दर संघर्ष समितीचे नेते दीपक भोसले, अजित बोरकर, सचिन पाटील, माने-देशमुख आदी उपस्थित होते. उसाच्या कांडीला सोन्याचा भाव मिळवून देऊ यंदा शेतकऱ्यांनी ऊस तोडीची घाई न करता थोडे थांबावे, उसाच्या कांडीला सोन्याचा भाव मिळवून देऊ. कर्नाटकातील कारखाने लवकर सुरू हो

Natepute Pratinidhi
अमित साटम यांना भुंकायलाच ठेवलंय, ते काम ते उत्तम करतात
महाराष्ट्र

अमित साटम यांना भुंकायलाच ठेवलंय, ते काम ते उत्तम करतात

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) अध्यक्ष अमित ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून, त्यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार तोफ डागली. मुंबई भाजपचे आमदार अमित साटम यांनी राज ठाकरे यांच्या नातवाच्या शाळेवरून केलेल्या टीकेला अमित ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले. "अमित साटम यांना भुंकायलाच ठेवले असून, ते त्यांचे काम अगदी उत्तम पद्धतीने करत आहेत," असा घणाघाती पलटवार अमित ठाकरे यांनी केला. नागपुरातील पाचपावली येथील सिंधू महाविद्यालयात मनविसेच्या सभासद नोंदणी मोहिमेची पाहणी केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. माझा मुलगा कोणत्या शाळेत जाणार, हे साटम ठरवणार का? अमराठी रिक्षाचालकांच्या कार्यक्रमात अमित साटम यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता अमित ठाकरे म्हणाले की, "स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि परिवहन मंत्र्यांनी मराठी सक्तीची केल्याचे सांगितले, तरी हे लोक हिंदीत भाषण करतात. यावरूनच यांना मराठी भाषेची किती काळजी आहे हे दिसून येते.

Natepute Pratinidhi
टिपू सुलतान मुद्द्यावरून मुस्लिमांना नाहक त्रास - सुजात आंबेडकर
महाराष्ट्र

टिपू सुलतान मुद्द्यावरून मुस्लिमांना नाहक त्रास - सुजात आंबेडकर

महाराष्ट्रात टिपू सुलतान यांच्या फोटोचा मुद्दा गेली 4 ते 5 वर्षे राजकीय स्वार्थासाठी चर्चेत आणला जात आहे. 2021 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी 'औरंगजेब आणि टिपू सुलतानाची औलाद' असे वक्तव्य करून या विषयाला वेगळे वळण दिले. त्यानंतर मुस्लिम युवकांना त्रास देणे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे आणि त्यांचे व्यवसाय-दुकाने बंद पाडण्याचे काम सुरू झाले. त्यामुळे मुस्लिम तरुणांसमोर नोकरी आणि रोजगाराची गंभीर समस्या निर्माण झाली आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला. सुजात आंबेडकर म्हणाले की, 2023 मध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती आणि अक्कलकोटच्या कार्यक्रमात टिपू सुलतानाचा फोटो स्टेजवर ठेवला होता. आता सर्व समाजाला एकत्र आणून राज्यात शांतता प्रस्थापित करणे हे आपले काम आहे. साखर सम्राटांचे इथेनॉल धोरणावर मौन सुजात आंबेडकर म्हणाले की, 2014 पासून देशात महागाई प्रचंड वाढली आहे. ज्यांनी पूर्वी गॅस सिलेंडर हातात घेऊन आंदोलने केली, त्यांच्याच काळात आज सर्वसामान्यांना गॅस, साखर आणि अन्नधान्याचे भाव परवडेनासे झाले आहेत. 2014 नंतर कृषी उत्पादन घटल्याने

Natepute Pratinidhi
संविधानातून टिपू सुलतानचा फोटो काढून दाखवा- जलील
महाराष्ट्र

संविधानातून टिपू सुलतानचा फोटो काढून दाखवा- जलील

कुठे वंदे मातरम‌ तर कुठे टिपू सुलतान यांच्या फोटोबद्दल बोलून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. निवडणुका आल्या की असे मुद्दे उपस्थित करून निवडणुका जिंकायची हे भाजपचे सूत्र आहे. असे प्रश्न उचलण्यापेक्षा दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईबद्दल भाजपने बोलावे, असा सल्ला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिला. बुधवारी सोलापुरातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मालेगावमध्ये उपमहापौरांनी टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यामुळे वाद उद‌्भवला होता. याबाबत पत्रकारांनी लक्ष वेधले असता इम्तियाज जलील म्हणाले, ‘ज्या संविधानावर आपला भारत देश जिवंत आहे, चालत आहे त्या संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये डॉ. बाबासाहेबांनीच राणी लक्ष्मीबाई आणि टिपू सुलतान यांचे फोटो लावले आहेत. ही मूळ प्रत लोकसभेत आहे. हिंमत असेल तर या संविधानातून यांचे फोटो काढून दाखवावे,’ असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले. नांदेड, धुळे व सोलापूर मनपात विरोधी पक्षनेतेपद एमआयएमला मिळवण्यासाठी हायकोर्टात जाऊ, असा इशाराही त्यांनी या वेळी बोलताना दिला. राज्यात संघटनवाढीवर आमच्या पक्षाचा आहे भर राज्यात संघटनवाढीवर आमच्या पक्षाचा भर आहे.

Natepute Pratinidhi
डोमिनेटर संघाने कोरले नगरसेवक चषकावर नाव
महाराष्ट्र

डोमिनेटर संघाने कोरले नगरसेवक चषकावर नाव

ईद-ए-मिलाद आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित नगरसेवक चषक 2026 ही ओपन बॉक्स क्रिकेट स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. एकूण 16 संघांचा सहभाग लाभलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दि डोमिनेटर संघाने आय ॲण्ड टी पॉवर संघावर 28 धावांनी मात करत नगरसेवक चषक पटकावला.

Natepute Pratinidhi
पाणी चोरी, कमी स्टाफ,राजकीय दबावाने नीरा उजवा कालव्याचे आवर्तन विस्कळीत
महाराष्ट्र

पाणी चोरी, कमी स्टाफ,राजकीय दबावाने नीरा उजवा कालव्याचे आवर्तन विस्कळीत

नीरा उजवा कालवा विभागातील पाण्याच्या आवर्तनाला राजकीय हस्तक्षेप, मनुष्यबळाचा प्रचंड तुटवडा आणि बेसुमार पाणी चोरीचा फटका बसला आहे. एकीकडे तिसंगी तलाव अद्याप कोरडाठाक पडलेला असताना दुसरीकडे कालव्यातून सोडलेले पाणी अपेक्षित गतीने पुढे सरकत नसल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. तिसंगी तलावात पाणी तातडीने सुरू करण्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नीरा उजवा कालवा विभाग मात्र या कोंडीत हतबल झाल्याचे दिसत आहे. नीरा उजवा कालव्यास 14 जुलैपासून वीर धरणातून सोडलेले पाणी सुरू आहे. पंढरपूर तालुक्यातील रांजणी ते उंबरगाव, तिसंगी गावापर्यंतच्या लाभक्षेत्रातील उभ्या पिकांना प्राधान्यक्रमाने पाणी सोडण्यात आले आहे. परंतु वरच्या तालुक्यातील राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप, कासेगाव, टाकळी, अनवली, बोहाळी, उंबरगाव, खर्डीसारख्या मोठ्या गावातील बड्या बागायतदार शेतकऱ्यांची शेततळी भरण्यापासून ते सांगोला आणि माळशिरस तालुक्यात पाणी वळवणे असे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे 35 दिवस झाले तरीही बोहाळी हद्दीपर्यंत पाण्याचे आवर्तन आलेले नाही. याच दरम्यान पाच नंबरचे गेट काढून सांगोला तालुक्यात पाणी चालू झाले आहे.

Natepute Pratinidhi
LOCAL UPDATE

तुमच्याकडे परिसरातील बातमी आहे?

माहिती WhatsAppवर पाठवा. पडताळणीनंतर Natepute Expressवर प्रकाशित केली जाईल.

माहिती पाठवा