अजितदादांवर प्रेम होते म्हणूनच पवार साहेबांची साथ सोडली
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत पक्षातील सद्य:स्थिती, नेत्यांमधील अंतर्गत मतभेद आणि राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या भेटीवर सविस्तर व स्पष्ट भाष्य केले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या आणि नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी सर्व कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना शांततेचे व एकजुटीचे आवाहन केले आहे. "घरामध्ये जसे मतभेद होतात, तसेच पक्षातही होतात; पण सर्वांना सोबत घेऊनच पुढे जावे लागते," असा मोलाचा सल्ला त्यांनी पक्षातील नेत्यांना दिला आहे. प्रशांत किशोरांच्या भेटीला फार महत्त्व न देण्याचा सल्ला राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती.