अकलूजच्या नागपंचमीत सूर्यवंशींना पैठणी, शिंदेंना नथ:जनसेवा संघटना आयोजित महोत्सवात मुलींसह महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; वैशाली वाघमारे रिलमेकिंगच्या मानकरी
अकलूज महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना आयोजित नागपंचमी महोत्सवात पैठणी स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या मानकरी कादंबरी सूर्यवंशीना पैठणी तर, उपविजेत्या पूजा शिंदेना सोन्याची नथ देण्यात आली. रिलमेकिंग स्पर्धेत वैशाली वाघमारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. येथील धवल श्रीराम मंदिरात नागपंचमीनिमित्त दोन दिवसीय महोत्सवात मुली व महिलांसाठी रांगोळी, मेंदी, पाककला, सौंदर्य प्रसाधन, निबंध, वक्तृत्व, रिलमेकिंग तसेच पैठणीच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. उर्वशीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन तर पद्मजादेवी मोहिते-पाटील व रीलस्टार सारिका देवरुखकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. अकलूजसारख्या ग्रामीण भागातील महिलांना आपल्या कला सादर करून नाग पंचमीचा आनंद घेण्यासाठी व्यासपीठ स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी हा उपक्रम गेल्या 25 वर्षांपूर्वी सुरू केला. तो पुढे डॉ. धवलसिंह यांनी सुरू ठेवला आहे.