Natepute Express
MARATHI NEWS

ताज्या मराठी बातम्या

तू माझ्याकडे बघतोस यावरून वाद
महाराष्ट्र

तू माझ्याकडे बघतोस यावरून वाद

LATEST STORIES

नवीन बातम्या

72 निकाल
तू माझ्याकडे बघतोस यावरून वाद
महाराष्ट्र

तू माझ्याकडे बघतोस यावरून वाद

बीड शहरालगतच्या इमामपूर रस्ता‎ परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ‎ जुन्या वादाच्या कारणावरून थरारक‎ गोळीबाराची घटना घडली. "तू‎आमच्याकडे काय बघतोस?'' असा ‎जाब विचारत झालेल्या‎ बाचाबाचीनंतर थेट पिस्तूल काढून ‎तीन राउंड फायर केले. या हल्ल्यात ‎फिर्यादी तरुण गंभीर जखमी झाला‎ असून या प्रकरणी दोन आरोपींना ‎गजाआड केले आहे.‎ फिर्यादी शेख मोहम्मद साद (22, रा.‎जुना बाजार, हत्तीखाना, बीड) यांनी ‎तक्रार दिली. त्यावरून सफवान खान,‎सय्यद साद, अखलाख यांच्यासह इतर‎6 ते 7 अज्ञात आरोपींवर ग्रामीण ‎ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान,‎तु माझ्याकडे काय बघतोस या‎कारणावरून हा वाद झाला होता.‎ दोन जणांना बेड्या,‎कारही केली जप्त‎ तपास अधिकारी सहायक‎पोलिस निरीक्षक बाळराजे ‎दराडे यांनी घटना घडल्यानंतर‎ तातडीने तपासाची चक्रे‎ फिरवली.

Natepute Pratinidhi
सडलेल्या भाज्या अन् मुदतबाह्य पदार्थांचा साठा
महाराष्ट्र

सडलेल्या भाज्या अन् मुदतबाह्य पदार्थांचा साठा

हॉटेल अमरप्रीत (अवतार मोटेल्स आणि सिने प्रा. लि.) मध्ये बटरच्या नावाखाली आरोग्यास घातक असणाऱ्या मार्गारीनचा वापर करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने छाप्यात सडलेल्या भाज्या, मुदतबाह्य पिझ्झा बेस आणि मशरूमचा साठा जप्त केला आहे. या त्रुटींनंतर हॉटेल अमरप्रीतचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे. हॉटेलमधील खाद्यसेवा पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिली. ही कारवाई सहआयुक्त दयानंद पाटील, कीर्तिका झाडे, वर्षा रोडे, प्रज्ञा सुरसे आदींच्या पथकाने केली. बटर व्हर्सेस मार्गारीन : नफ्याचे गणित बटरचा दर 450 ते 550 रुपये प्रतिकिलो आहे, तर मार्गारीन 120 ते 180 रुपयांमध्ये मिळते. बटरऐवजी मार्गारीन वापरल्यास कच्च्या मालाचा खर्च 60 ते 70 टक्क्यांनी घटतो. यामुळे थेट नफ्यात बदल होतो. अस्सल बटर फ्रिजबाहेर राहिल्यास किंवा तापमान कमी-जास्त झाल्यास लगेच खराब होते आणि त्याला आंबट/खराब वास येतो.

Natepute Pratinidhi
14 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 2 दिवसांत त्रुटी दूर करा
महाराष्ट्र

14 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 2 दिवसांत त्रुटी दूर करा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत बँकांकडून सादर झालेल्या 14 लाख शेतकऱ्यांच्या यादीत 43 त्रुटी आढळल्या. त्यामुळे शासनाने संबंधित बँकांना ‘शानिटी डाटा’ देऊन दोन दिवसांत चुका दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत. 13 ऑगस्टपर्यंत दुरुस्ती पूर्ण करून 15 ऑगस्टनंतर सुधारित याद्या पोर्टलवर अपलोड केल्या जाणार आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 6 लाख 22 हजार 27 पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात 5,029 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले. पहिल्या टप्प्यात 17 लाख पात्र शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर अपलोड झाली होती. धाराशिव जिल्ह्यात 47 हजार 686 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या होत्या. दुसऱ्या टप्प्यातील याद्यांच्या तपासणीत कर्जावरील व्याज आकारणीत तफावत आढळली.

Natepute Pratinidhi
राज्यात पावसाचे पुन्हा कमबॅक:मुंबईसह 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट
महाराष्ट्र

राज्यात पावसाचे पुन्हा कमबॅक:मुंबईसह 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यात मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रासह देशातील तब्बल 19 राज्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे. रात्रीपासूनच राज्याच्या अनेक भागांत पावसाची संततधार सुरू आहे. कुठे कोणता अलर्ट? (राज्यातील पावसाची स्थिती) हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी आज सतर्कतेचे इशारे जारी केले आहेत. ऑरेंज अलर्ट: पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहणार असल्याने येथे 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. यलो अलर्ट: मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणपट्ट्यासह नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांवर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, या 9 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

Natepute Pratinidhi
राज ठाकरे सकाळीच थेट 'वर्षा'वर
महाराष्ट्र

राज ठाकरे सकाळीच थेट 'वर्षा'वर

गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी भाजप आणि महायुतीवर सातत्याने टीका करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सकाळी 8.20 वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे यांचा ताफा मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर पोहोचला. भाजपवर आक्रमक भूमिका घेत असतानाच राज ठाकरेंनी घेतलेल्या या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. भेटीचे प्रमुख कारण काय? राज ठाकरे यांच्यासोबत या भेटीत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) अध्यक्ष अजिंक्य नाईक हेदेखील उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, ही कोणतीही अचानक झालेली राजकीय भेट नसून दोन दिवसांपूर्वीच ठरलेली पूर्वनियोजित भेट होती.

Natepute Pratinidhi
घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली:2 जणांचा मृत्यू; 5 ते 6 जण ढिगाऱ्याखाली
महाराष्ट्र

घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली:2 जणांचा मृत्यू; 5 ते 6 जण ढिगाऱ्याखाली

मुंबईत रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटकोपर-साकीनाका परिसरात एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली आहे. येथील चिरागनगर परिसरात गौसिया चाळीवर अचानक डोंगराचा मोठा कडा (दरड) कोसळल्याने दोन ते तीन घरे ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, आणखी 5 ते 6 जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पहाटेच्या गाढ झोपेतच काळ आला! स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रभर पावसाचा जोर कायम होता. याच दरम्यान, पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास अचानक डोंगराचा काही भाग खचला आणि माती, तसेच दगडांचे मोठे ढिगारे खाली असलेल्या दोन-तीन घरांवर येऊन कोसळले. सर्वजण गाढ झोपेत असतानाच हा प्रकार घडल्याने घरातील नागरिकांना जीव वाचवून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.

Natepute Pratinidhi
जालन्याची रेशीम कोष बाजारपेठ असेल टॅक्स फ्री
महाराष्ट्र

जालन्याची रेशीम कोष बाजारपेठ असेल टॅक्स फ्री

रेशीम कोष विक्रीसाठी शेतकऱ्यांना ‎आता कर्नाटकच्या रामनगर‎ बाजारपेठेपर्यंत जावे लागणार‎ नाही. त्यासाठी जालन्यातच रेशीम ‎कोष बाजारपेठ विकसित करण्यात ‎आली आहे. कर्नाटकच्या ‎बाजारपेठेत 1 टक्के शुल्क‎ आकारले जाते. ते येथे माफ ‎राहणार आहे. शिवाय कोषाचे ‎वैज्ञानिक ग्रेडिंग उपलब्ध असेल.‎ड्रायिंगची अत्याधुनिक सुविधा‎ असेल. लिलाव आणि व्यवहार ‎डिजिटल होतील. येथे शेतकरी ‎आणि व्यापाऱ्यांसाठी निवासाची ‎सुविधाही उपलब्ध करून देण्यात‎ आली आहे. 14 ऑगस्ट रोजी ‎मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या‎ हस्ते या बाजारपेठेचे उद्घाटन केले ‎जाणार आहे.‎ जालना बाजार समितीत गेल्या 8‎ वर्षांपासून सुरू असलेली ही रेशीम‎ कोष बाजारपेठ आता स्वतःच्या ‎जागेत स्थलांतरित होत आहे. 14‎ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‎या बाजारपेठेचे उद्घाटन होईल.‎

Natepute Pratinidhi
सरकारने लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा
महाराष्ट्र

सरकारने लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा

मराठा आरक्षणासाठी चिठ्ठी लिहून एका 30 वर्षीय युवकाने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिंतूर तालुक्यातील बामणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भोसी येथे 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी ही घटना घडली. गणेश आश्रोबा ठोंबरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश ठोंबरे याने राहत्या घरात दोरीने गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर नातेवाइकांनी त्याला तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी मुंडे यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. दरम्यान, बामणी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात जाऊन प्राथमिक पंचनामा केला. मृताच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश ठोंबरे हा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून अत्यंत निराश होता.

Natepute Pratinidhi
3 विद्यार्थिनींच्या मृत्यूवरून राजकारण तापलं
महाराष्ट्र

3 विद्यार्थिनींच्या मृत्यूवरून राजकारण तापलं

गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा झालेला मृत्यू अतिशय दुर्दैवी असून राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, या दुर्दैवी घटनेवर संजय राऊत केवळ राजकारण करत आहेत आणि राजकीय पोळी भाजत आहेत. राऊतांनी सरकारला प्रश्न विचारण्यापूर्वी ही आश्रमशाळा नक्की कुणाची आहे, याची माहिती घ्यायला हवी होती. ती आश्रमशाळा काँग्रेसचे माजी खासदार मारोतराव कोवासे यांचीच आहे, असा खळबळजनक खुलासा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन यांनी संजय राऊत आणि महाविकास आघाडीवर (MVA) सडकून टीका केली. आश्रमशाळा काँग्रेस नेत्याची, मग राऊत काँग्रेसला जाब विचारणार का? सर्पदंशाच्या घटनेचा संदर्भ देत बन म्हणाले, "ज्या आश्रमशाळेत हा प्रकार घडला, ती संस्था काँग्रेसचे अनेक वर्षे खासदार राहिलेले आणि स्थानिक नेते मारोतराव कोवासे यांची आहे. राज्य सरकार प्रत्येक विद्यार्थ्यामागे दोन हजार रुपये अनुदान देते, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची प्राथमिक जबाबदारी ही संस्थाचालकाची असते.

Natepute Pratinidhi
महाराष्ट्रात आजपासून दूध महागलं
महाराष्ट्र

महाराष्ट्रात आजपासून दूध महागलं

महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर आणखी एक भार पडला आहे. महाराष्ट्रात आज, 11 ऑगस्ट 2026 पासून गायीच्या आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गायीचे दूध 60 रुपयांवरून 62 रुपये, तर म्हशीचे दूध 76 रुपयांवरून 78 रुपये प्रतिलिटर झाले आहे. दूध उत्पादक आणि दूध प्रक्रिया उद्योगाच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दुधाच्या दरवाढीचा परिणाम केवळ पिशवीतील दूध खरेदीवर होणार नसून दही, ताक, लोणी, पनीर, चीज, तूप, फ्लेवर्ड मिल्क आणि दुधापासून तयार होणाऱ्या मिठाईच्या किमतींवरही होण्याची शक्यता आहे. या दुग्धजन्य पदार्थांच्या दरात सुमारे 10 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Natepute Pratinidhi
रांचीमध्ये विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज
महाराष्ट्र

रांचीमध्ये विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज

रांचीमध्ये विद्यार्थ्यांवर अमानुष हल्ला करणारे हे 'इंडिया' आघाडीतीलच हल्लेखोर आहेत. यामुळे काँग्रेसला तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. काँग्रेस आणि राहुल गांधी यांची भूमिका या प्रकरणात पूर्णपणे दुटप्पी आहे, असे म्हणत रांची येथे नोकरभरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्यावरून भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेस, राहुल गांधी तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आशिष शेलार म्हणाले की, रांचीतील या गंभीर घटनेवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची बोबडी का बंद आहे? तेथील तरुण-तरुणी आणि विद्यार्थी हे आपले नाहीत का? या प्रकरणात मातोश्री आणि शिवतीर्थाचे दरवाजे बंद का आहेत? विरोधी पक्षांनी केवळ राजकीय सोयीची भूमिका घेण्याचे काम केले असून, ते कधीही विद्यार्थ्यांचे हित पाहत नाहीत.

Natepute Pratinidhi
फडणवीसांचे सर्व डाव संपले
महाराष्ट्र

फडणवीसांचे सर्व डाव संपले

मराठा समाजाची कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत पुन्हा एकदा राज्य सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सडकून टीका केली आहे. "सत्तेचा गैरवापर करून मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्रे जाणीवपूर्वक रद्द केली जात आहेत. मात्र, फडणवीसांचे आता सर्व डाव संपले असून, आता माझा डाव सुरू होईल," असा उघड इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. सोलापूरच्या शिवाजी चौकात जरांगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे यांनी काही कागदोपत्री पुरावेही माध्यमांसमोर सादर केले.

Natepute Pratinidhi
LOCAL UPDATE

तुमच्याकडे परिसरातील बातमी आहे?

माहिती WhatsAppवर पाठवा. पडताळणीनंतर Natepute Expressवर प्रकाशित केली जाईल.

माहिती पाठवा