Natepute Express
MARATHI NEWS

ताज्या मराठी बातम्या

सीजेपीच्या बैठकीत दिपकेंच्या वडिलांनाही प्रवेश नाही
महाराष्ट्र

सीजेपीच्या बैठकीत दिपकेंच्या वडिलांनाही प्रवेश नाही

LATEST STORIES

नवीन बातम्या

72 निकाल
सीजेपीच्या बैठकीत दिपकेंच्या वडिलांनाही प्रवेश नाही
महाराष्ट्र

सीजेपीच्या बैठकीत दिपकेंच्या वडिलांनाही प्रवेश नाही

देशातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सीजेपी (कॉक्रोच जनता पार्टी) राजकीय पक्ष स्थापन करणार नाही. त्याऐवजी दबावगट म्हणून काम करणार, असे सीजेपीतर्फे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. न्यायव्यवस्था, मीडिया आणि निवडणूक आयोग यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांवरील लोकांचा विश्वास उडाल्याचे जंतर-मंतर, बंगाल, मुंबई आणि चेन्नईसह देशभरात स्पष्टपणे दिसून आले आहे. त्यामुळे संस्थांमधील नि:पक्षता आणि उत्तरदायित्व पुनरुज्जीवित करण्यासाठी देशव्यापी चळवळ उभारणार, असेही सांगण्यात आले. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंच्या वाळूज येथील निवासस्थानी मंगळवारी रात्री अडीच वाजेपर्यंत आणि बुधवारी सकाळी पक्षाच्या कोअर कमिटीची राष्ट्रीय बैठक झाली.

Natepute Pratinidhi
रेपो दर कायम, गृह-वाहन कर्जाचा हप्ता जैसे थे
महाराष्ट्र

रेपो दर कायम, गृह-वाहन कर्जाचा हप्ता जैसे थे

आरबीआयच्या पतधोरण समितीने बुधवारी सलग चौथ्यांदा रेपो दर 5.25% वर कायम ठेवला. यामुळे गृह, वाहन व फ्लोटिंग रेट असलेल्या इतर कर्जांचा ईएमआय वाढणार नाही. आरबीआयने डिसेंबर 2025 मध्ये रेपो दरात 0.25% ची कपात केली होती. बँकेने म्हटले की, व्याजदरात बदल करण्याऐवजी आर्थिक स्थिरता राखणे गरजेचे आहे. त्यामुळे पतधोरणाचा दृष्टिकोनही तटस्थ ठेवला आहे. आरबीआयने आर्थिक वर्ष 2027 साठी जीडीपी वाढीचा अंदाज 6.6% वरून 6.7% पर्यंत वाढवला, तर किरकोळ महागाईचा अंदाज 5.1% वरून 5.0% पर्यंत कमी केला आहे. यूपीआयवर शुल्क : सुविधांसाठीचा खर्च कोणाला तरी उचलावा लागणार व्यावसायिकांना केल्या जाणाऱ्या2,000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय पेमेंटवर 0.25 ते 0.40% एमडीआर लावण्याचा प्रस्ताव सरकारने आणला आहे. वैयक्तिक व्यवहार विनामूल्य राहतील.

Natepute Pratinidhi
अमृता फडणवीस म्हणाल्या ‎मला राजकारणात रस नाही‎
महाराष्ट्र

अमृता फडणवीस म्हणाल्या ‎मला राजकारणात रस नाही‎

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ‎‎यांच्यावर काँग्रसेकडून करण्यात‎आलेली गुंगी गुडीया ही टिका‎‎ निषेधार्ह ‎‎असल्याचे मत ‎‎‎मुख्यमंत्री देवेंद्र ‎‎‎फडणवीस यांच्या ‎‎‎पत्नी अमृता ‎‎‎फडणवीस यांनी ‎‎‎व्यक्त केले. जे ‎‎‎दिल्ली येथील ‎‎आंदोलनाबाबत विचारलेल्या ‎प्रश्नावर त्या म्हणाल्या, की जेन झी ‎‎सकारात्मक आहे. त्यांची वाटचाल‎ योग्य दिशेने सुरु आहे. दिल्लीच्या ‎‎आंदोलनात काही अपप्रवृत्ती शिरल्या ‎‎होत्या. मला राजकारणात काही रस‎ नाही. मात्र, लोकांसाठी काम करत‎ राहणार त्यांनी सांगितले.‎

Natepute Pratinidhi
राज्यात 55 कोटींचे 28 लाखकिलो बनावट पनीर केले जप्त
महाराष्ट्र

राज्यात 55 कोटींचे 28 लाखकिलो बनावट पनीर केले जप्त

आरोग्याशी खेळणाऱ्या आणि अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. राज्यात 30 जुलै 2026 पासून अ‍ॅनालॉग अर्थात नॉन-डेअरी (कृत्रिम) पनीरच्या उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर एका वर्षासाठी पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुंढे म्हणाले, राज्यभरातून 308 ठिकाणांवरून पनीरचे नमुने घेतले होते. या तपासणीत तब्बल 35 टक्के नमुने आरोग्यास अत्यंत घातक आढळले आहेत.

Natepute Pratinidhi
12 हजार शाळांना कुलूप!:तब्बल 40 टक्के विद्यार्थी बारावीपूर्वीच शिक्षण सोडतात'; विजय वडेट्टीवारांचे सरकारवर टीकास्त्र
महाराष्ट्र

12 हजार शाळांना कुलूप!:तब्बल 40 टक्के विद्यार्थी बारावीपूर्वीच शिक्षण सोडतात'; विजय वडेट्टीवारांचे सरकारवर टीकास्त्र

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेच्या स्थितीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशात हजारो शाळा बंद होत असून बारावीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण सोडत असल्याचा दावा करत त्यांनी सरकारच्या शिक्षण धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये वडेट्टीवार म्हणाले, "शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत इतकं असंवेदनशील सरकार देशाने यापूर्वी कधी पाहिलं नसेल." त्यांच्या म्हणण्यानुसार, देशात तब्बल 12 हजार शाळांना कुलूप लागले आहे, बारावीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच सुमारे 40 टक्के विद्यार्थी शिक्षण सोडतात आणि एक लाखाहून अधिक शाळा केवळ एका शिक्षकाच्या भरवशावर चालत आहेत.

Natepute Pratinidhi
'हैदराबाद गॅझेटिअरने आरक्षण मिळत नाही:सरकारने समाजाला फसवले हे मनोज जरांगेंना आधीच सांगितले होते- शिवानंद भानुसे
महाराष्ट्र

'हैदराबाद गॅझेटिअरने आरक्षण मिळत नाही:सरकारने समाजाला फसवले हे मनोज जरांगेंना आधीच सांगितले होते- शिवानंद भानुसे

देवेंद्र फडणवीस, विखे पाटील अन् सर्वांत मोठे एकनाथ शिंदेंनी समाजाला फसवले हे सत्य आहे, जरांगे पाटील का फसत आहेत? त्यांनी फसू नये समजून घ्यावे, असे मराठा सेवा संघाचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी म्हटले आहे. हैदराबाद गॅझेटिअर लागू करून मराठा समाजाला आरक्षण मिळत नसते, हे 2 सप्टेंबरचा शासन निर्णय निघण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांना सांगितले होते असे त्यांनी बुलढाणा येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. शिवानंद भानुसे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मी साक्षीदार राहिलो आहे. मी त्यांच्या शिष्ट मंडळातही काम केले आहे. मुख्यमंत्र्यी आणि मंत्रिमंडळाशी देखील चर्चा केली आहे. मराठा सेवा संघाने 1990 पासून लढा सुरू केला होता मराठ्याचे ओबीसीकरण त्याच पद्धतीने हे आंदोलन पुढे सुरू होते. परंतु वाशीमध्ये सगेसोयरे हा मुद्दा ज्यावेळी आला त्यावेळी आम्ही त्याला विरोध केला होता.

Natepute Pratinidhi
'कॉकरोच जनता पार्टी'चे पुढील टार्गेट कोणते?:छत्रपती संभाजीनगरमध्ये आज कोअर कमिटीची बैठक
महाराष्ट्र

'कॉकरोच जनता पार्टी'चे पुढील टार्गेट कोणते?:छत्रपती संभाजीनगरमध्ये आज कोअर कमिटीची बैठक

नीट पेपरफुटी प्रकरणात थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास सरकारला भाग पाडणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'ची (CJP) सध्या देशभरात जोरदार चर्चा आहे. जंतर-मंतरवरील ऐतिहासिक यशानंतर आता या संघटनेची पुढील वाटचाल कशी असेल, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर, पुढील रणनीती ठरवण्यासाठी पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी 2 दिवसीय अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. राजकीय पक्ष की दबावगट? सीजेपीने भूमिका केली स्पष्ट जेन-झी (Gen-Z) तरुणांना त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरवणाऱ्या सीजेपीचे रूपांतर आता राजकीय पक्षात होणार का? असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांनी यावर सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे

Natepute Pratinidhi
'गुंगी-गुडिया' टीकेवर सुनील तटकरे संतप्त
महाराष्ट्र

'गुंगी-गुडिया' टीकेवर सुनील तटकरे संतप्त

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने केलेल्या टीकेवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. सुनेत्रा पवार यांच्याबद्दल गुंगी गुडीया असा शब्दप्रयोग करत काँग्रेसने आपली वैचारिक दिवाळखोरीच दाखवून दिली आहे, अशा शब्दांत तटकरे यांनी काँग्रेसचा तीव्र निषेध केला. केवळ दिलगिरीने विषय संपत नाही काँग्रेसच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Natepute Pratinidhi
सिद्धिविनायक'च्या देणग्यांत घोळ?:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विशेष ऑडिटचे आदेश
महाराष्ट्र

सिद्धिविनायक'च्या देणग्यांत घोळ?:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विशेष ऑडिटचे आदेश

देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची राज्य सरकारने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाचे 'विशेष लेखापरीक्षण' करण्याचे अत्यंत महत्त्वाचे आदेश दिले आहेत. गेल्या 5 वर्षांत मंदिरात आलेल्या रोख देणग्या, सोने-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या हिशेबात मोठी अनियमितता असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या सखोल चौकशीतून कोणते सत्य बाहेर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Natepute Pratinidhi
शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांचे कोल्हापुरात निधन:वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; शिक्षण, आरोग्यासह क्रीडा क्षेत्रावर शोककळा
महाराष्ट्र

शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांचे कोल्हापुरात निधन:वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; शिक्षण, आरोग्यासह क्रीडा क्षेत्रावर शोककळा

देशातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारे शिक्षणमहर्षी, पद्मश्री पुरस्कार विजेते आणि बिहार तसेच त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांचे मंगळवारी कोल्हापुरात वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. सोमवारी रात्री त्यांची प्रकृती खालावली होती. बुधवारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि समाजसेवा या क्षेत्रांत भरीव योगदान देणाऱ्या डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने राज्यासह देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.

Natepute Pratinidhi
धनुष्यबाण कुणाचा?:शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
महाराष्ट्र

धनुष्यबाण कुणाचा?:शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे? या महाराष्ट्राच्या राजकारणासाठी बहुचर्चित असलेल्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार असून, आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील वकील कोर्टात आपला सविस्तर युक्तिवाद मांडणार आहेत. त्यामुळे या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्ट काय निरीक्षणे नोंदवणार आणि कोणता निर्णय देणार, याकडे संपूर्ण राज्याचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

Natepute Pratinidhi
'आपले, संदिग्ध अन् विरोधी'; भाजपकडून मतदारांची गुपचूप वर्गवारी:रोहित पवार
महाराष्ट्र

'आपले, संदिग्ध अन् विरोधी'; भाजपकडून मतदारांची गुपचूप वर्गवारी:रोहित पवार

मतदार याद्यांमधील कथित गडबडी आणि निवडणूक आयोगाच्या 'SIR' मोहिमेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भारतीय जनता पक्षावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पश्चिम बंगालमध्ये SIR मोहिमेच्या माध्यमातून विरोधी विचारांच्या मतदारांची नावे वगळणे किंवा ती भलत्याच ठिकाणी दाखवण्याचे भयानक प्रकार संपूर्ण देशाने पाहिले आहेत. आता त्यातच भाजपने आपल्या 'BLA' मार्फत समांतर यंत्रणा उभी केली असून मतदारांची 'आपले', 'संदिग्ध' आणि 'विरोधी' अशी वर्गवारी केली जात आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

Natepute Pratinidhi
LOCAL UPDATE

तुमच्याकडे परिसरातील बातमी आहे?

माहिती WhatsAppवर पाठवा. पडताळणीनंतर Natepute Expressवर प्रकाशित केली जाईल.

माहिती पाठवा